Five More positive Patients found in Udgir
Five More positive Patients found in Udgir 
मुख्य बातम्या मोबाईल

उदगीरात आणखीन पाच व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात एकूण ११ कोरोना रुग्ण

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण  वाढत आहेत . मुंबई पुण्याहून आलेल्या व्यक्तीमुळ ही संख्या आता दिवसें दिवस वाढतच चालली आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून आज ५१ व्यक्तींचे लातूर येथील विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उदगीर तालुक्यातील कासराळ  येथील  चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव झाले आहेत.  या चारही व्यक्ती   चिमाचीवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या  संपर्कात आल्या होत्या. उदगीर येथील एक व्यक्ती पॉझिटिव आला आहे तो व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आल्याची माहिती समोर येत आहे उदगीर तालुक्यातील एकूण पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर लातुरातील हडको परिसरात चार तर अहमदपुर तालुक्यातील मांडणी गावचे दोन व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल रात्रीला उशिरा प्राप्त झाला आहे.

लातूर जिल्ह्यातून एकूण ११० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी ९३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यापैकी लातूर येथील चार उदगीर येथील पाच अहमदपूर येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सहा व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत, अशी माहिती डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT