मुख्य बातम्या मोबाईल

रंजन गोगोई स्त्रीलंपट माणूस, मार्कंडय काटजू यांचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश रंजन गोगोई यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर देशभर संतप्त प्रतिक्रिया येत असताना आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले निवृत्त सरन्यायाधिश मार्कंडय काटजू 
हे तरी गप्प कसे बसतील !

त्यांनी गोगोई यांचा समाचार घेताना म्हटले आहे एक विकृत माणसाला राज्यसभेवर घेतले जात असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणते असू शकते. 

काटजू यांनी आज केलेल्या ट्‌विटमध्ये गोगोई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "" मी वीस वर्षे वकीली व्यवसाय केला आणि वीस वर्षे न्यायाधिशपदावर काम केले आहे. मी माझ्या आयुष्यात जसे अनेक चांगले न्यायाधिश पाहिले तसे काही वाईट न्यायाधिशही पाहिले आहेत. मात्र गोगोई सारखा 
विकृत, निर्लज्ज न्यायाधिश मी पाहिला नाही असेही काटजू यांनी म्हटले आहे. 

काटजू यांनीच नव्हे तर न्याय व्यवस्थेतील अनेक दिग्गज विधितज्ज्ञांनीही गोगोई यांच्यावर कडाडून हल्ला केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधिश कुरियन जोसेफ यांनी गोगोई यांच्या टीकास्त्र सोडले आहे.

काटजू हे तर नेहमीच राजकारण्यावरही जोरदार टीकास्त्र सोडत असतात. त्यांच्या टिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा बडे नेते असतील. टिका करण्यास ते कधी मागेपुढे पाहत नाही आणि परिणामाची चिंताही ते करीत नाहीत. आज तर गोगोई यांना त्यांनी विकृतच म्हणून वाद ओढून घेतला आहे. 

जोसेफ यांच्यासह तीन न्यायाधिशांनी माध्यमांशी बोलताना गोगोई यांच्याबाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रहार केले आहेत. वास्तविक गोगोई यांनीच राज्यसभा सदस्य होण्यास नकार दिला पाहिजे.

मी निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही पदावर काम करणार नाही असे मी जाहीर केले होते याची आठवणही जोसेफ यांनी करून दिली आहे. 

गोगोई यांनी मात्र हे हल्ले परतवून लावले आहेत. प्रथम मला राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ द्या त्यानंतर मला जे काही सांगायचे आहे ते सांगणार आहे. माझ्या टिकाकारांना मी ही उत्तर देणार आहे पण, त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT