मुख्य बातम्या मोबाईल

महापौर आरक्षणाची तारीख ठरली!

सरकारनामा ब्युरो

अकोला : विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाचा मुहूर्त अखेर ठरला. अकोल्यासह राज्यातील २७ महापालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण बुधवारी (ता.१३) दुपारी ३ वाजता मंत्रालयातील विस्तारीत इमारतीतील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

अकोल्यासह राज्यातील २७ महापालिकेतील महापौरांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपला. त्यापूर्वीच नव्याने आरक्षण काढून महापौरांची निवड करणे आवश्‍यक होते. याच काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने महापौरपदांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ९ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच नव्याने आरक्षण काढणे आवश्‍यक होते. त्यानुसार बुधवार, ता. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सर्व २७ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण काढले जाणार आहे.   

अकोला महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ९ सप्टेंबर रोजी संपला असून, वाढीव तीन महिन्यांचा कार्यकाळ ९ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अकोला महापौर पद खुले होते. सर्वाधिक ४८ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचे विजय अग्रवाल यांची महापौर पदी वर्णी लागली होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT