Mayor Satish Ku;karni
Mayor Satish Ku;karni 
मुख्य बातम्या मोबाईल

महापौर म्हणाले, गर्दी होते तेव्हा पोलिस बघे होतात!

सरकारनामा ब्युरो

 नाशिक : शहरात कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असताना बाजारपेठेतील गर्दी कमी होत नाही. यासंदर्भात गेले काही दिवस नगरसेवक, महापौर, लोकप्रतिनिधींवर निष्क्रीय असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आता रस्त्यावर उतरले आहेत. बाजारात गर्दी होते, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करायला हवा. मात्र ते बघ्याची भूमिका घेतात, असा आरोप त्यांनी केला. 

काल सायंकाळी महापौरांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. यावेळी  गर्दी असलेल्या ठिकाणी दुकानदार व नागरिकांना भेटून हात जोडून नियम पाळण्याची विनंती केली. शहरात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मृतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. महापालिका व खासगी कोविड सेंटर अपुरे पडत असून, रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. याउपरही शहरातील बाजारपेठांमधील गर्दी कमी होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी रस्त्यावर उतरून नागरिकांसह दुकानदारांना आवाहन करत आहेत. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकानदारांची असून, गर्दीबाबत नियम न पाळल्यास दुकानदारांवर कार्यवाही करावी लागेल, असा सज्जड दम दिला. शालिमार, शिवाजी रोड, मेन रोड, भद्रकाली मंदिर, तिवंधा चौक, रविवार कारंजा, भद्रकाली भाजी मार्केट, भद्रकाली टॅक्सी स्टॅन्ड, दूध बाजार, फुले मार्केट, सारडा सर्कल या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी महापौरांनी फिरून दुकानदारांना हात जोडून नियम पाळण्याची विनंती केली. 

...
पोलिसांचा ढिसाळ कारभार 
बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी नागरिक व दुकानदारांची व पोलिसांचीदेखील असून, बहुतेक ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस यंत्रणेचा ढिसाळ कारभार दिसून आल्याचा आरोप महापौर कुलकर्णी यांनी केला. रविवार कारंजा भागात पोलिस उपस्थित असतानाही कोणत्याही प्रकारचे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असून, कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन, पोलिस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे काम केल्यास परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
... 
गर्दीवर नियंत्रणाची जबाबदारी फक्त पालिका प्रशासनाची नसून नागरिक, दुकानदार व पोलिसांचीदेखील आहे. गर्दी नियंत्रित करताना पोलिसांचा ढिसाळपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते. कोरोना महामारीचे संकट थोपविण्यासाठी महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करावे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT