Doctor
Doctor 
मुख्य बातम्या मोबाईल

राज्यभरात आज वैद्यकीय सेवा बंद; सव्वालाख डॉक्‍टर सहभागी

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) राजपत्रित अधिसूचना प्रकाशित केली असून, याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात आज (ता. ११) राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील सव्वालाख डॉक्‍टर सहभागी होणार आहेत. उद्या रुग्णालयातील अत्यावश्‍यक सेवा व अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत; मात्र इतर प्राथमिक सेवा बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले.

संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोग्य सेवा बंद असणार आहे. यात दवाखाने, ओपीडी, क्‍लिनिक अशा प्राथमिक सेवा बंद राहतील, तर अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहेत. बंदमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. कोव्हिड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतिगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरू राहणार आहेत.

काय आहे अधिसूचनेत?
अधिसूचनेत सीसीआयएमने ५८ शस्त्रक्रियांना शल्यतंत्र आणि शालाक्‍य तंत्र सांगून पदव्युत्तर शिक्षणात समाविष्ट केले आहे. यात जनरल सर्जरी, युरॉलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी, ईएनटी, ऑफ्थाल्मोलॉजी, डेंटिस्ट्री यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयात कार्यरत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्‍टरांची ज्युनिअर डॉक्‍टर्स नेटवर्कही आंदोलन करणार आहे. आंदोलनास मार्ड संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT