Sarkarnama Banner - 2021-05-18T092150.884.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-18T092150.884.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

तौते चक्रीवादळामुळे विमान सेवा रद्द झाल्याने फटका नेत्यांना.. नांदेडमध्ये अनेक मंत्री अडकले..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : तौते चक्रीवादळाचा मुंबई विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. काल दिवसभरात विमानतळाहून 56 हून अधिक विमानसेवा तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराव्या लागल्या आहेत. मुंबईची विमानसेवा काही काळासाठी रद्द झाल्यानं नांदेडमध्ये अनेक मंत्री अडकले आहेत. आता या नेत्यांनी विश्रामगृहावर मुक्काम ठोकला आहे. The minister got stuck in Nanded after the flight was canceled

काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर काल दुपारी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार झिशान सिद्दीकी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे  उपस्थित होते.  

दुपारी कळमनुरीत सावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्वजण नांदेड विमानतळावरहून मुंबईकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, मुंबईत विमानतळ प्रशासनाने विमानसेवा रद्द असल्याचे सांगितल्याने नेत्यांना नांदेड मध्ये मुक्काम ठोकावा लागला आहे. तौते चक्रीवादळाचा मुंबई विमानसेवेला मोठा फटका बसला. काल दिवसभरात विमानतळाहून 56 हून अधिक विमानसेवा तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराव्या लागल्या. सोमवारी रात्री उशिरा ही सेवा पून्हा कार्यन्वित करावी लागली. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ ते २ विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती.

माञ तौते चक्रीवादळाने रौद्ररुप पाहता. नंतर 4 पर्यंत ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. माञ त्यानंतरही परिस्थिती नियंञणात येत नसल्याने पुढे 6:30 पर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  माञ राञीच्या सुमारासही सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहून रात्री 10 च्या सुमारास विमानसेवा पून्हा कार्यान्वित करण्यात आली. काल दिवसभरात फक्त 22 विमानांनी आकाशात झेप घेतली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT