hasan mushriff
hasan mushriff 
मुख्य बातम्या मोबाईल

चंद्रकांतदादांनी जळत राहावे : हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना राज्य शासन अतिशय चांगले काम करत आहे. त्याला विरोधकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. अशा कामांत राजकारण येता कामा नये पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजपा नेत्यांकडून सरकारवर सुरू असलेली टीका दुर्दैवी आहे. "जलनेवाले जलते रहेंगे, हम उसी रोशनीसे चलते रहेंगे, अपने जलवे दिखाते रहेंगे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

जिल्हा बॅंकेच्या प्रगतीबाबात माहिती देण्यासाठी श्री. मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना विरोधकांकडून होत असलेल्या टिकेबाबत विचारले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहेत. त्याला काही अंशी यशही येत आहे. गेल्या महिन्याभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विरोधातील या लढ्यात सामान्यांना बळ देण्याचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या पगारात कोणताही कपात न करता तो दिला गेला. शेतकऱ्यांसाठीही अनेक चांगले निर्णय घेतले, त्यामुळे शेतीची कामे बंद नाहीत. राज्याला श्री. ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच अतिशय शांत, संयमी आणि कणखर मुख्यमंत्री मिळाला आहे. श्री. ठाकरे यांनीही कोणताही गाजावाजा न करता कोरोना विरोधातील लढ्यात राज्याच्या जनतेला नेहमीच दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

ते म्हणाले,"राज्यावर आलेल्या अशा संकटाच्या काळात पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे. विरोधकांनी सरकारसोबत काम करण्याची गरज आहे. सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात घालून काम केले तर हे संकट टळू शकते. पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे. विरोधकांकडून कोणताही मुद्दा उपस्थित करून त्यावर टीका केली जाते हे योग्य नाही.'

तीन महिन्यांचे भाडे सरकारने भरावे: निलेश राणे
पुणे : घरमालकांनी भाडेकरूंना तीन महिने भाडे मागू नये, असे निर्देश काल राज्य सरकारने दिले आहेत. यावर "तीन महिन्याने घरभाडे पुढे ढकलले पण तीन महिन्यानंतर पैसे माणसाने आणायचे कुठून? नुसते पुढे ढकलून चालणार नाही, तीन महिन्यांचे भाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किंवा माफ करावे," असे माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.

भाडेकरूंची अडचण लक्षात घेऊन सरकारने घरमालकांना तीन महिने भाडे न मागण्याबाबत निर्देश दिले. निलेश राणे यांनी या निर्णयावर बोलताना "तीन महिन्यानंतर लोकांनी पैसे कोठून आणायचे? त्यापेक्षा सगळे भाडे माफ करा," असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT