Minister of State for Home Affairs Satej Patil tasted the spicy misal
Minister of State for Home Affairs Satej Patil tasted the spicy misal 
मुख्य बातम्या मोबाईल

गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी मारला झणझणीत मिसळीवर ताव 

सुनील पाटील

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे पायाला भिंगरी बांधून प्रचारात उतरले.

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचार आणि सभांमध्ये व्यस्त असणारे पाटील यांनी आज (ता. 1 डिसेंबर) मतदानादिवशी कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळीवर ताव मारला. याच ठिकाणी त्यांनी कोल्हापूरसह पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदान कसे व किती टक्के झाले? याची माहितीही ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून घेतली. 

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या धामधूमीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार इर्ष्येने सुरु ठेवला होता.

आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. 

गृहराज्यमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बूथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी, कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील सुप्रसिद्ध हॉटेल विठाई येथे महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद घेत. विविध जिल्ह्यांत होत असलेल्या मतदानाचा आढावाही त्यांनी घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT