Mira Bayander BJP Women officer Bearer Booked by Police
Mira Bayander BJP Women officer Bearer Booked by Police 
मुख्य बातम्या मोबाईल

बोगस आॅडिओ क्लिप प्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यास अटक

सरकारनामा ब्युरो

मीरा रोड : मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजाची बनावट ऑडिओ क्‍लिप समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी भाजपच्या उत्तर भारतीय महिला मोर्चा पदाधिकाऱ्यास अटक केली आहे. रंजू झा असे या महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.

या संदर्भात आमदार गीता जैन यांच्या स्वीय सहायकांच्या तक्रारीवरून १७ जुलै रोजी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्यास अटक करून शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपी रंजू झा या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या मीरा-भाईंदर उपाध्यक्ष आहेत. रंजू झा यांना अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती नवघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपत पाटील यांनी दिली. 

व्हायरल ऑडिओ क्‍लिपमध्ये एका महिलेच्या आवाजात कोरोनासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. "केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकेला दीड लाख रुपये देत आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्यावर लक्ष देत आहेत. सर्दी, ताप आला असेल तर सकारात्मक दाखवून त्यांना रुग्णालयात जबरदस्ती दाखल केले जात आहे. दीड लाख रुपये त्यांना मिळाले, की रुग्णाला घरी पाठवण्यात येते. त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे, तर कोव्हिड तपासणी बंद करा' असे आवाहन त्या ऑडिओ क्‍लिपमध्ये करण्यात आले होते. 

आमदार गीता जैन यांचा बनावट आवाज काढून जैन यांचे नाव आणि फोटोसह याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार गीता जैन यांनी तो आवाज माझा नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्या ऑडिओ क्‍लिपमधील आवाज माझा नसून, मी हा ऑडिओ बनवला नाही, तसेच पोलिसांनी मला अटक केली नाही, मी कोर्टातही गेले नाही असा दावा रंजू झा यांनी  केला; मात्र हा दावा पोलिसांनी फेटाळला.

Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT