Nilesh lanke.jpg
Nilesh lanke.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार लंकेंचे काम पाहून आली आर. आर. आबांची आठवण, पोपटराव पवारांकडून काैतुक

मार्तंड बुचुडे

पारनेर : "कोरोना संकटात आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केलेले कार्य पाहिल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील (आबा) (R.R. Patil) यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही,'' असे गौरवोद्‌गार आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आज काढले. (MLA came to see the work of Lanka. R. Memories of father, Kaituk from Popatrao Pawar)

कोरोना संकटात कुटुंबातील सदस्य, तसेच नातेवाईकही रुग्णाजवळ येत नाहीत. मात्र, एक आमदार केवळ जनता धोक्‍यात आहे म्हणून स्वत:चा जीव धोक्‍यात घालून कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र सेवा करीत आहे, असेही पवार म्हणाले. 

भाळवणी येथील कोविड सेंटरला पवार यांनी भेट दिली त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""कोरोना संकटात राज्यभरात अनेक लोकप्रतिनिधी काम करीत आहेत; परंतु भाळवणी येथे एक हजार शंभर बेडच्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून, स्वतःचा जीव धोक्‍यात घालून नीलेश लंके जे काम करीत आहेत, ते खरोखर राज्याला दिशादर्शक आहे.'' 

हेही वाचा...

""जगाच्या पाठीवर अनेक वेळा अनेक प्रकारची संकटे आली. काही संकटे देशापुरती मर्यादित असतात; मात्र कोरोनाचे संकट जागतिक पातळीवरील आहे. या वैश्‍विक महामारीत कार्यकर्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळी समाजावर संकट येते, त्या काळात समाजासाठी धावून जाणे ही लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी असते. संकटामध्ये स्वतःचा जीव धोक्‍यात घालणाराच खरा लोकप्रतिनिधी असतो. तीच भूमिका लंके प्रामाणिकपणे निभावत आहेत. समाजात पैशाची गरज नाही; परंतु अशाप्रकारे समाजासाठी उभ्या राहणाऱ्या माणसाची आज देशाला, राज्याला गरज आहे,'' असेही ते म्हणाले. 

या वेळी केडगाव येथील पोपटराव पवार मित्रमंडळाच्या वतीने कोविड सेंटरला टेम्पोभर साहित्य भेट देण्यात आले. ऍड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, दत्ता कोरडे, संदीप चौधरी, राजेंद्र चौधरी, अशोक रोहोकले, किसन सातपुते, सचिन ठाणगे, अविनाश जाधव, डॉ. योगेश पवार, बापू शिर्के, प्रमोद गोडसे, संदीप रोहोकले, सत्यम निमसे, संदीप रोहोकले आदी उपस्थित होते. 

लंके कोविड सेंटरमध्ये झोपतात ! 

""आर. आर. आबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या रूपाने राज्यात ग्रामविकासाची "न भूतो न भविष्यती' अशी मोठी चळवळ उभी राहिली. आजही कोरोनाच्या संकटात आमदार नीलेश लंके व त्यांचे कार्यकर्ते जे काम करीत आहेत, ते कौतुकास्पद आहे. लंके कोविड सेंटरमध्येच झोपतात हे ऐकून खूप आश्‍चर्य वाटले. रुग्णांची ते आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळे रुग्णास घरच्यासारखा आधार वाटतो,'' असेही पोपटराव पवार या वेळी म्हणाले. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT