WhatsApp Image 2021-08-21 at 3.50.59 PM.jpeg
WhatsApp Image 2021-08-21 at 3.50.59 PM.jpeg 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार लंके झाले आक्रमक : देवरेंचा अहवाल मांडला हजारें पुढे

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा चौकशी अहवाल नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात पाठविला आहे.  हा अहवाल आज आमदार नीलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समोर मांडला. तसेच यावर चर्चा करून आमदार लंके यांनी स्वतःची बाजू मांडली. MLA Lanke became aggressive: Devare's report presented thousands ahead

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप शुक्रवारी (ता. 20) सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात पारनेरचे आमदार नीलेश लंके व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे येत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी आमदार लंके यांनी हजारे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालाची प्रत दाखवत सविस्तर चर्चा केली.

अण्णा हजारे म्हणाले, तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासबंधीच्या बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील असेही हजारे यांनी सांगितले. 

हेही वाचा...

तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत कसा भ्रष्टाचार केला याचीही माहिती दिली. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये तहसिलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते याबाबतची माहिती लंके यांनी यावेळी हजारे यांना दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवरी आदी उपस्थित होते.

राळेगणसिद्धी येथे येऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. तहसीलदार ज्योती देवेरे यांच्या कामाबाबतचा तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालाची प्रत अण्णांना दाखविली. यावेळी अण्णांनी देखील त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून देखील अण्णांनी याबाबतची माहिती घेतली आहे. 

-    आमदार निलेश लंके, पारनेर विधानसभा मतदार संघ. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT