nilesh lanke.jpg
nilesh lanke.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार नीलेश लंके हे आर.आर. पाटलांची उणिव भरून काढणारे - अमोल मिटकरी

मार्तंड बुचुडे

पारनेर : पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे व आमदार नीलेश लंके यांचा वाद राज्यभर गाजला होता. तहसीलदार देवरे यांची जळगावला बदली झाली. तरीही या वादाचे शल्य आमदार नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातून गेलेले नाही. MLA Nilesh Lanka is R.R. Patil's shortcomings - Amol Mitkari

पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे 78 लाख रूपयांचा कोल्हापुरी बंधारा,  उचाळे वस्ती रस्ता 25 लाख रूपये, व 33 /11 केव्ही  विजउपकेंद्रासाठी 30 लाख रूपये अशा एक कोटी 33 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार नीलेश लंके, कृषी व पशू संवर्धन समितीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे, माहिती व तंत्रज्ञान प्रदेशाध्यक्ष जीतेश सरडे, अॅड. राहुल झावरे, अध्यक्ष बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, ठकाराम  लंके, सरपंच गुंडा भोसले, पोपटराव माळी, जयसिंग मापारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

या प्रसंगी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, कमळाच्या फुलांनीच या देशाचा घात केला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षात जे जमले नाही ते आम्ही दोन वर्षात केले आहे. फडणवीस यांनी सुद्धा फक्त खूनशी राजकारण केले. 

आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात रूग्ण सेवा करून अनेकांचे जीव वाचविले. गाडगे बाबांसारखी रंजल्या गांजल्यांची सेवा केली अशा आमदार नीलेश लंके यांच्या सारख्या देव माणसावर अनेक जण टीका करतात तेव्हा मी असे म्हणेल, राजकारणात भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करा कारण त्यांचे नाव घेऊन त्यांना मोठे करू नका.
  
मंदिरे उघडण्या करीता ढोल वाजविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हे माहीत नाही की जनसेवा हीच खरी सेवा आहे. त्यांना गाडगे बाबा माहीत नसावे असे वाटते. मी संत गाडगे बाबांना फक्त पुस्तकात वाचले मात्र त्या प्रमाणे काम करणारे व राष्ट्रवादी काँग्रेचे नेते (कै.) आर.आर. पाटलांची उणिव भरून काढणार नेता म्हणजे आमदार लंके होय. 

हेही वाचा...

माझ्यावर अनेक जण टीका करतात मात्र मी माझ्या आईचे मंगळसूत्र तर नाही ना विकले किंवा आई बहिणीचे संसार तर नाही ना उध्वस्थ केले. आमदार लंके यांचे एवढे मोठे काम आहे की, त्याच्यावर भविष्यात पीएच.डी. सुद्धा होईल, असेही शेवटी मिटकरी म्हणाले.     

आमदार लंके म्हणाले, पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचली पाहिजे हे माझे ध्येय आहे. आतापर्यंत सुमारे शंभर कोटींचा निधी तालुक्यात आणला आहे, असेही लंके म्हणाले.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT