Raj Thackeray Pays Tributes to Mahatma Gandhi
Raj Thackeray Pays Tributes to Mahatma Gandhi 
मुख्य बातम्या मोबाईल

महात्मा गांधींचे प्रांजळपण अंगिकारलं तर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला' हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

राज यांनी आपल्या फेसबूक पेजवरुन ही पोस्ट केली आहे, ''आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं ह्यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय,'' असंही राज यांनी म्हटलं आहे.

''त्यांच्यात अहंभाव नव्हता, 'माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,' हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरु झालं आहे,'' असाही टोला राज यांनी लगावला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT