Sarkarnama Banner - 2021-08-12T090401.983.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-12T090401.983.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मनसे नेते गजानन काळेंवर गुन्हा दाखल, पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबई :  मनसे  MNS शहर अध्यक्ष गजानन काळे Gajanan Kale यांच्यावर त्यांच्याच पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन काळे यांची पत्नीने नेरूळ Nerul पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा तक्रारीमध्ये म्हटलं आहे. 

मोदींनी ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली ; कॉग्रेसची जहरी टीका
गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे.  २००८ मध्ये आमचं लग्न झालं.  लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सापळा रंग व माझी जात कारणावरून मला टोमणे मारू लागला, जातीवाचक शिवीगाळ करू लागला. ते मला म्हणाले की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही,असे ते म्हणाले. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती' असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.

संभाजीराजेंना बोलू देण्यासाठी संजय राऊतांनी चढवला आवाज
नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक चर्चेसाठी सादर करण्यात आले होते. अनेक सदस्यांनी यावरी चर्चेत सहभाग घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या विधेयकावर बोलण्याची संधी मागितली होती. मात्र, सुरूवातीला त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आवाज चढवत त्यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत संभाजीराजेंना बोलण्याची परवानगी देण्यात आली. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT