MNS Killedar
MNS Killedar 
मुख्य बातम्या मोबाईल

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उर्जामंत्री नितीन राऊत तसेच उर्जा सचिवांसह बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी वीज बिलांबाबत जनतेची फसवणुक केली आहे. कोरोना काळात प्रचंड वीज बिल आकारुन जनतेची आर्थिक लुबाडणूक केली. ही बिले कमी करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी अचानक घुमजाव केल्याने जनतेला क्लेश झाला आहे. त्यामुळे उर्जामंत्र्यांसह अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी `मनसे`तर्फे करण्यात आली आहे. 

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. ते म्हणाले, कोरोना महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात 22 मार्च ते 8 जून या कालावधीत टाळेबंदी करण्यात आली होती. या काळात महावितरणकडून वीज मीटर रिडिंगसाठी कुठेही प्रतिनिधी पाठविण्यात आले नव्हते. वीज देयके वितरीत करण्यात आली नव्हती. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीत वीज वापरासाठी बेस्ट कंपनीने वापरापेक्षा तिप्पट, चौपट अवाजवी बिल आकारणी झाली. 

या कालावधीत अनेकांचे रोजगार गेले आहेत. कामावर असलेल्यांचे वेतन कतपात झालेली आहे. अशा स्थितीत वीजेची अफाट बिले आकारणी झाली. त्यामुळे जनतेत त्याबाबत प्रचंड संताप होता. त्यासाठी आंदोलने झाली. जनतेचा आक्रोश पाहून वारंवार बैठका घेण्यात आल्या. त्यात ऊर्जामंत्री व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यात वारंवार बैठका झाल्या. त्यात वीजेची बिले कमी करण्याबाबत विचार सुरु आहे. वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ. नागदरिकांना दिलासा देऊ. असे आश्वसान देण्यात आले होते. तशा बातम्या वृत्तवाहिन्या व दैनिकांत प्रसिद्ध झाल्या. मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव करीत ही बिले भरावीच लागतील असे म्हटले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून1 अगेले पाच महिने सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढीव वीज बिले मागे घेण्यात यावीत यासाठी निवेदन व आंदोलन केले होते. नितीन राऊत यांची भेट घेतली होती. तेव्हा केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करुन वीजबिलांमध्ये सवलत देण्यासाठी अनुदानाची मागणी करुन, सुट दिली जाईल असे त्यांनी म्हटले होते. मात्र आता त्यांनी यु टर्न घेतल्याने त्यांच्या विरोधात जनतेला प्रचंड मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा दाकल करावा असे निवेदनात म्हटले आहे.       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT