मुख्य बातम्या मोबाईल

 मनसेचे खातं उघडलं, प्रमोद पाटील विजयी 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कल्याण ग्रामीणमधून मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील हे विजयी झाले असून मनसेचे खाते उघडले आहे. हा निकाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा देणारा ठरणार आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद सोनावणे हे एकमेव आमदार निवडून आले होते. यावेळी कल्याणने मनसेची इज्जत राखली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने नोटीस पाठविली होती. त्यावेळी राज्यात खळबळ उडाली होती. राज यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनाही तशीच नोटीस आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले होते. 

विधानसभा लढायची की नाही या मनस्थितीत असलेल्या मनसेचे ना हो करीत मैदानात उडी घेतली. प्रचारही केला. मनसेला दोन तीन जागा मिळतील असे वाटत होते पण, आता एकाच जागावर समाधान मानावे लागेल असे दिसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT