2sd22f.jpg
2sd22f.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी वसुलीचे नवे रेट कार्ड ; मनसेचा टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. mns sandeep deshpande alleges recovery operation in the name of corona in mumbai

मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर वेळेची मर्यादा आहे. सकाळी सात ते चार पर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली मुंबईत नवीन वसुली मोहीम सुरू झाल्याचे देशपांडे यांनी म्हटलं आहे. संध्याकाळी चार नंतरही मुंबईतील दुकानं सर्रास सुरू ठेवली जातात व दुकानदारांकडून वसुली केली जात असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

“आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून, मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु सायंकाळी चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान 5000, मध्यम दुकान 2000, छोटे दुकान 1000 वसुली चे नवे रेट कार्ड” असं टि्वट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.  

राऊतांना राणे दोषाची काविळ झाल्याने त्यांना राणेंचं खातं छोटचं वाटणार
मुंबई :  ''शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना  दिसत नाही. नारायण राणे साहेबांना मिळालेलं खातं छोट आहे की मोठे हे येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली असून त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार, '' अशी टिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT