MNS Workers to give protection to Raj Thackeray
MNS Workers to give protection to Raj Thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

मनसैनिक देणार राज ठाकरेंना सुरक्षा 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा राज्य शासनाने कमी केली आहे . त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी समर्थ असल्याचं मनसे नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज वांद्र्यात मनसेच्या होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीच्या वेळी मनसेचे महाराष्ट्र कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक लिहिलेले टीशर्ट घालून राज यांना संरक्षण पुरविणार आहेत. 

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली असून मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

राज यांना याआधी झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. ती घटवून एस्काॅर्टसह वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज यांच्या बरोबरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचीही सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, राम कदम या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था सरकारने काढून घेतली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाईंना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. रविवारी राज्य सरकाने राज्यातील विविध नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशपांडे यांनी सरदेसाई यांच्या वरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. संदीप देशपांडे आपल्या ट्वीटमध्ये म्हाणाले की, वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय...
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT