Dombiwali MNS workers
Dombiwali MNS workers 
मुख्य बातम्या मोबाईल

खासदार श्रीकांत शिंदेंचे मनसेला खिंडार : शहराध्यक्षासह इतर कार्यकर्ते शिवसेनेत

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम शिवसेनेच्या वाटेवर आहेत.  त्यांच्यासोबत अर्जुन पाटील, सागर जेधे, दीपक भोसले हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

कदम हे मनसेच्या स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच राज ठाकरेंसोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत असल्याने त्यांचे शिवसेनेत जाणे हे धक्कादायक मानले जात आहे. 25 ते 30 वाहनांतून हे  कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदें यांच्या नेतृत्वात हा प्रवेश होत आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी मनसे आक्रमक होत असल्याने डोंबिवलीतील फटका पक्षाला मोठा असू शकतो. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण याच मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी आहेत. आगामी महापालिकेच्या दृष्टीने हे पक्षांतर होत असल्याची चर्चा आहे.

) राजेश शांताराम कदम 
मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली   शहर अध्यक्ष. माजी परिवहन सभापती

२) सागर रवींद्र जेधे 
मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 

३) दीपक शांताराम भोसले 
डोंबिवली शहर संघटक, माजी परिवहन समिती सदस्य 

४) राहुल गणपुले 
प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 

५) कौस्तुभ फकडे 
मनविसे डोंबिवली शहर सचिव  

६) सचिन कस्तुर
मनविसे शहर संघटक

७) स्वप्नील वाणी 
मनसे शाखा अध्यक्ष

८) निखिल साळुंखे 
मनसे उपशाखा अध्यक्ष

९) कुणाल मोर्ये 
मनविसे शाखा अध्यक्ष

१०) महेश कदम

११) राजेश मुणगेकर 
शहर संघटक

१२) प्रथमेश खरात
मनसे विभाग सचिव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT