MP Sunil Tatkare lauded the work of Minister of State Aditi Tatkare
MP Sunil Tatkare lauded the work of Minister of State Aditi Tatkare  
मुख्य बातम्या मोबाईल

सुनील तटकरे म्हणतात, 'आता बाप से बेटा नव्हे; तर बेटी सवाई' 

सरकारनामा ब्यूरो

श्रीवर्धन (जि. रायगड) : "रोह्यातील कुंडलिका नदीसंवर्धन प्रकल्प पाहून ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांनी कौतुकाची थाप दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीदेखील या कामाची दखल घेत बारामतीमधून नदी संवर्धन प्रकल्प पाहण्यास टीम पाठवली. आपण केलेला नदी संवर्धन प्रकल्प पाहून त्यापद्धतीने बारामतीत काम करण्याचा मानस अजितदादा यांचा आहे. याचे श्रेय पालकमंत्री आदिती तटकरे यांना देताना पहिले "बाप से बेटा सवाई' अशी म्हण होती; परंतु आपल्याकडे आता "बाप से बेटी सवाई' अशी परिस्थिती आहे,'' अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले. 

श्रीवर्धनमधील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी झालेल्या सभेत खासदार तटकरे बोलत होते. या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, नगरसेवक अनंत गुरव, वसंत यादव प्रगती आडवडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, "कोरोनामुळे श्रीवर्धनमध्ये कार्यक्रम घेता आले नाहीत. मात्र, श्रीवर्धनला पर्यटनाचा "ब' दर्जा दिल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येक पाखाडी पाखडीत विकासकाम करणार आहे. श्रीवर्धन वासीयांच्या स्वप्नातील विकास खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केला जाणार आहे.'' 

या वेळी शहरातील शिवाजी चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण, कुंभारवाडा विभागातील चौकास संत शिरोमणी गोरोबाकाका चौक असे नामकरण करणे, शहरातील गणेश आळीपासून जीवना रोडपर्यंत पऱ्ह्याचे काम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून राजू भगत यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, वरचा जीवना येथील पऱ्ह्याच्या काम, इंदिरानगर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम, मूळगाव गांधी मैदान येथील पऱ्ह्याचे काम, पेशवे आळीपासून दादर पुलापर्यंतच्या पऱ्ह्याचे  काम, तसेच फकी मोहल्ला येथील कब्रस्थानला कंपाउंड बांधणे आदी कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन या वेळी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT