MP Supriya Sule performed by Appreciation of Dr. Amol Kolhe
MP Supriya Sule performed by Appreciation of Dr. Amol Kolhe 
मुख्य बातम्या मोबाईल

मलासुद्धा जे जमलं नाही, ते कोल्हेंनी पहिल्याच टर्ममध्ये मिळविले 

नितीन बारवकर

शिरूर : "लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून थेट खासदारकी आणि संसदपटू पुरस्कारदेखील मिळविला. एवढ्या अल्प कालावधीत तर मलासुद्धा हे जमलं नाही. खरंच ते नशीबवान आहेत. ते बोलायला उभे राहिले की संसददेखील शांत होऊन त्यांचे विचार ऐकते,' अशा शब्दांत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले. 

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने सुळे यांनी शिरूर तालुक्‍याचा दौरा केला. त्या वेळी त्यांनी डॉ. कोल्हे यांचे कौतुक केले. 

खासदार सुळे म्हणाल्या की, "माझ्या बारामती लोकसभा मतदार संघात तरी एक-दोन अडचणी आहेत. पण, कोल्हे यांना मात्र कोणतेही टेन्शन नाही. तुम्ही अमोल कोल्हे यांची खासदारपदी केलेली निवड अगदी योग्य आहे. ते पाच वर्षांच्या कालावधीत काहीतरी उत्तम करून दाखवतील. देशातील एक उत्तम मतदारसंघ म्हणून ते शिरूर मतदारसंघाला नावारूपाला आणतील. त्यांचे विचार इतके प्रगल्भ आहेत की ते संसदेत बोलायला उभे राहिले की संपूर्ण संसद शांतपणे त्यांचे विचार ऐकते.' 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हे यांच्यातील गुण हेरून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली. त्यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले. प्रश्‍न मांडण्याची वेगळी शैली, आटोपशीर आणि प्रभावी मांडणी तसेच संसदेतील उल्लेखनीय कामकाजामुळे त्यांना पहिल्याच वर्षी संसदपटूचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवायला मलादेखील दोन टर्म वाट पाहावी लागली. पण, कोल्हेंनी पहिल्याच सत्रात आपले नेतृत्वगुण संसदेत दाखवून दिले, असे खासदार सुळे यांनी नमूद केले. 

आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून ते आरामशीर शुटींगला जाऊ शकतात, इतका त्यांच्या कामात चांगुलपणा आहे, असेही सुळे म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT