Yashomati Thakur
Yashomati Thakur  
मुख्य बातम्या मोबाईल

मंत्र्याच्या मागे पुढे करणाऱ्यांना काँग्रेसची पदे मिळाली

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत (MPCC working committee) पक्षात सक्रिय नसलेल्यांना संधी (Inactive workers got posts) देत निष्ठावंतावर अन्याय झाला आहे. (Injustice with loyal workers) त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलाचा आगामी महपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेसला काहीही उपयोग होणार नाही. (This change will not beneficial for NMC & ZP Election) हा कुठल्या पक्षाचा आरोप नाही, तर दस्तुरखुद कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीच ही भावना झाली आहे. काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा त्यांच्या पक्षातील खदखद बाहेर पडली. 

कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत समावेश केलेल्यात बहुतांश निष्क्रीय पदाधिकारी आहेत. ज्यांनी कधी पक्षाच्या आंदोलनात सहभाग घेतलेला नाही. मंत्र्यांच्या मागे पुढे करणाऱ्यांनाच कार्यकारिणीत संधी दिल्यामुळे महपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, आदी तक्रारी श्रीमती ठाकूर यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केल्या. अप्रत्यक्षात या तक्रारीचा सूर पक्षाचे संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांवर होता. 

श्रीमती ठाकूर यांच्याशी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा करून विश्रामगृहावर निवेदन दिले. तत्पूर्वी श्रीमती ठाकूर यांनी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, अण्णा पाटील, हनीफ बशीर, गुलाम शेख, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, रईस शेख, सुरेश मारू, लक्ष्मण धोत्रे, सेवा दलाचे वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, संदीप शर्मा, स्वप्नील पाटील, उद्धव पवार, कैलास कडलग, ओबीसी सेलचे विजय राऊत, जावेद पठाण, तौफीक शेख, अरुण दोंदे, कामील इनामदार, सिद्धांत गांगुर्डे, इमरान अन्सारी, शबीर पठाण, अण्णा मोरे, दिनेश निकाळे, सचिन दीक्षित, प्रवीण काटे आदींची मत जाणून घेतली. 

कॉंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली. त्यांना नाराज न होता पक्षाच्या कामात सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या. प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठांच्या कानावर तक्रारी घालू. कार्यकर्ता हाच पक्षाचा कण आहे. याबाबत सर्व वरिष्ठ नेते तक्रारींची निश्चित दखल घेतील. 
-यशोमती ठाकूर, महिला बालकल्याणमंत्री  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT