Twenty Eight Percent Patients Recovered in Mumbai From Corona
Twenty Eight Percent Patients Recovered in Mumbai From Corona 
मुख्य बातम्या मोबाईल

पन्नाशीच्या आतील रुग्ण ६२ टक्के! सर्वाधिक कोरोनामुक्त तिशीपर्यंतचे

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : शहरातील कोरोनाचे तब्बल ६२ टक्के रुग्ण पन्नाशीच्या आतील, तर ३० ते ४९ वयोगटातील रुग्णांची संख्या ३८.९९ टक्के आहे. कोव्हिडवर मात करणाऱ्यांमध्ये १० ते २९ वर्षे वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २८ टक्के रुग्णांनी कोव्हिड-१९ विषाणूवर मात केली आहे. मुंबईत गुरुवारी सायंकापर्यंत २३ हजार ८४७ रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी ६७५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात ३० ते ४९ वर्षे वयोगटातील ९२९९ रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट होते. महाराष्ट्रासह देशातही याच वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे. वयाच्या ५५ व्या वर्षानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. मुंबईत ५० वर्षांवरील ८७५० रुग्ण आहेत. ५० ते ६९ वयोगटातील २२ टक्के आणि ७० वर्षांवरील १५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १० ते २९ वयोगटातील ३५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

  मुंबईची कोरोनाची आकडेवारी

वयोगट (वर्षे) रुग्ण  डिस्चार्ज डिस्चार्ज (टक्के) रुग्ण (टक्के)
१० पर्यंत    ४८१  १५५   ३२    
१० ते २९  ५३१३  १९१२  ३५    २२.२७
३० ते ३९ ९२९९  २८५२ ३०  ३८.९९
५० ते ६९  ७१३१  १५८३  २२   २९.९०
७० वरील १६१९ २४९ १५    ६.७८
एकूण २३८४७ ६७५१   २८    १०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT