Sarkarnama Banner - 2021-07-28T134004.444.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-28T134004.444.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेसच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त..

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील काँग्रेसच्या Congress ताब्यात असलेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती Murum Agricultural Produce Market Committee बरखास्त करण्यात आली आहे .

किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणे, कडता व सॅम्पल, ग्रेडिंग व्यवस्था नसणे,अशा विविध कारणाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला सहाय्यक निबंधक पी. एल. शहापूरकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

 
आमदारांवरील खटला मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
महेश गव्हाणे यांनी एप्रिल 2019 मध्ये या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांनी तक्रारीबद्दल जिल्हा उपनिबंधकांना बाजार समिती संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी मागणी केली होती.  त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी हा आदेश काढला आहे. 
आता लस कुठे मिळणार ? खासदाराचे आरोग्यमंत्र्यांना पत्र 
कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम विद्यमान मंडळ यांनी त्यांना सोपवलेली कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याने व संचालक मंडळाला दिलेल्या सूचनांचे पालन केले नसल्याचे आदेशात म्हटले आहे. सहाय्यक निबंधक पी. एल. शहापूरकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT