नाशिक : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या महिन्याखेर ९०१ कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ६३६ जण कोरोनामुक्त झालेत. त्यात पोलिस, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के आहे, अशी माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मालेगाव शहरात सर्वप्रथम झाला. तेव्हा राज्य शासनाने संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रशासन, व्यवस्थेतील कोरोना बाधितांसाठी या रुग्णालयात व्यवस्था केली होती. यामध्ये संस्थेच्या प्रशासनाने केलेल्या परिश्रमामुळे मोठी मदत व कोविड-१९ नियंत्रणातील योगदान यशस्वी ठरले.
यासंदर्भात श्रीमती पवार म्हणाल्या, की डॉ. पवार महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘डेडीकेटेड’ कोविड रुग्णालयाच्या (डीसीएच) ६० खाटा, तर कोविड केअर सेंटरच्या शंभर खाटा आहेत. अतिगंभीर रुग्णांसाठी आरआयसीयू या विशेष अतिदक्षता कक्षात २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार, निवासी डॉक्टर, फिजिओथेरपी, परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्या सेवा आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेंटिलेटर, मोबाईल एक्स-रे, लॅब अशा सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. बाह्यरुग्ण विभागातही गेल्या महिन्याखेर आठ हजार १७५ रुग्णांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रीमती पवार, कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील आणि रुग्णालयाची टीम काम करत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत आहेत. महाविद्यालयातर्फे रोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी रुग्णालयातील उपचारासंबंधी संवाद साधला जातो.
...
१३ हजार ४० चाचण्या पूर्ण
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर येथील संशोधन केंद्रात कोविड-१९ चाचणीसाठी लॅब सुरु करण्यात आली. या कोरोना टेस्टिग लॅबमध्ये गेल्या महिन्याखेरपर्यंत १३ हजार ४० चाचण्या करण्यात आल्या आहेत त्याआधी या चाचण्यांसाठी रुग्णांचे स्वॅब नमुणे पुणे व धुळे येथे पाठविले जात होते. त्यात धुळे येथे अडचणी निर्माण झाल्या. पुणे येथे कालापव्यय होत असे. स्थानिक पातळीवर ही लॅब सुरु झाल्याने चाचण्या अधिक गतीने झाल्या,.
...
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX8B8C4u&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=d47716e97ae88b13f1071dba051030b9&oe=5F5887A7
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.