4nana_4.jpg
4nana_4.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

बारामतीसाठी मला प्लॅनिंग करावं लागेल ; पुण्यात आलो की मोठ्या जहाजांना फार त्रास होतो!

सरकारनामा ब्युरो

लोणावळा : ''बारामतीमध्ये कॉंग्रेसला मानणारा बराच मोठा वर्ग आहे. तिथे मला प्लॅनिंग करावे लागेल. तिथे होणाऱ्या अत्याचार व्यवस्थेच्या विरोधात जो उद्रेक आहे. तो मला माहिती आहे. मात्र, आपल्याला पुढे जायचे असेल तर शत्रुला घरातच जाऊन मारले पाहिजे,'' असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. नाना पटोले यांनी लोणावळ्यात काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. Nana Patole criticism of Ajit Pawar Lonavla Congress meet

नाना पटोले म्हणाले की, मोठ्या जहाजांना लवकर बुडण्याची भीती असते.  लहान होडी इकडून तिकडे लवकर निघून जाते. माझा इशारा तुम्ही समजून घ्या. मी  पुण्याच्या दैाऱ्याला आलो तर तिकडे मोठ्या जहाजांना फार त्रास होतो, शत्रुकडे फार लक्ष न देता आपण आपल्या घराकडे लक्ष देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले.  

''पुण्याचे  पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे आहे, कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाही. कोणत्याही कमिटीवर  घ्यायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास पालकमंत्री देतात, त्या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा,'' असेही पटोले म्हणाले.

''काँग्रेस स्वबळावर लढणार याबाबत मी बोललो आहे. माझी माघार नाही. स्वबळावर लढाईला आपण कामाला लागा. काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितलं तुम्ही कामाला लागा. मी बोलत होतो तर त्रास होत होता ते बोलले तर ठीक आहे,'' असेही ते म्हणाले.


नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री ; डॅा. भारुड यांची 'आदिवासी विकास'च्या आयुक्तपदी बदली
नंदुरबार :  नंदुरबार कलेक्टर म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. राजेंद्र भारूड  Rajendra Bharud यांची पुणे येथे आदिवासी विकास विभागातील प्रशिक्षण व संशोधन संस्थेत आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून मनिषा खत्री Manisha Khatri या पदभार  सांभाळणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT