Sarkarnama - 2021-09-13T094925.551.jpg
Sarkarnama - 2021-09-13T094925.551.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही? पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई :   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी Ashutosh Kumbakoni यांच्या भूमिकेवरून संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी महाधिवक्ता असताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का जात आहे? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही?, असा सवालही पटोले यांनी केला आहे. पटोले हे माध्यमांशी बोलत होते. 

पटोले म्हणाले, ''मागच्या कार्यकाळात कुंभकोणी होते.आताही ते आहेत मात्र सध्याचे सरकार सातत्याने खटले हारत आहेत. ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून निवडणुका घ्या. 2017मध्ये एका परिपत्रकाच्या आधारावर तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. त्यावेळी महाधिक्ता कुंभकोणी होते. आजही कुंभकोणीच अधिवक्ता आहेत. तरीही कोर्टाचे निर्णय वारंवार सरकारच्या विरोधात का येत आहेत. याबाबत आम्हाला संशय आहे म्हणून या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे आमचं दायित्व आहे, 

73व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली की त्यावर लगेच प्रशासक नेमला जातो. एकही दिवस वाया घालवता येत नाही. मात्र, फडणवीस सरकारने दोन वर्षे निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामागची कारणं काय होती? त्याची माहिती घेतली पाहिजे. आज सर्वोच्च न्यायालय वारंवार ओबीसींच्या जागा बाजूला सारून निवडणुका घ्या असं का म्हणत आहे. म्हणून आमच्या मनात संशय आला. त्यामुळे राज्य सरकारला आम्ही आमची सूचना कळवली आहे, असंही पटोले यांनी सांगितलं. कुंभकोणी यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस सरकारने केली असल्याने त्यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पुणे : मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार प्रकरणी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय महिला आयोगाने महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. तर भाजपने राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी आहे, यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या भूमिकेच्या व विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेने उत्तर दिलं आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण sakinaka rape case, महिला अत्याचाराच्या घटना आणि विरोधी पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेनेनं  shiv sena सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT