Sarkarnama (82).jpg
Sarkarnama (82).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नंदुरबार पोलिस अधीक्षकपदी पी. आर. पाटील, तर महेंद्र पंडित मुंबईच्या उपायुक्तपदी

सरकारनामा ब्युरो

नंदुरबार : येथील पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित Mahendra Panditयांची मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर नंदुरबार येथे नवीन पोलिस अधीक्षकपदी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील P. R. Patil यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार येथे दोन वर्षांपूर्वी कार्यभार घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात यश मिळवले आहे. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने अनेक आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणले आहेत. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर खाकी वर्दीत असणाऱ्या दर्दी अधिकाऱ्याचे त्यांनी दर्शन घडवले होते. रोजगार हिरावला गेलेल्या अनेक कुटुंबीयांना त्यांनी जीवनावश्यक कीट वाटप केले होते. यातून नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने माणुसकीचे दर्शन घडविले होते.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हजारोंवर गुन्हे दाखल होत कोट्यवधींचा दंड वसूल करीत त्यांनी शासनास महसूल मिळवून दिला. नंदुरबार जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी देखील तेवढेच प्रयत्न करण्यात आले. अनेक आव्हानात्मक गुन्ह्याची कोणतेही पुरावे नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उकल करण्यात यश मिळवले.  त्यांची मुंबई शहर उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आता नंदुरबार येथे पोलिस अधीक्षकपदी कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धक्कादायक : पोलिस महिलेने घडवली सहकाऱ्याची हत्या 
नवी मुंबई :  कारची धडक देऊन हत्या करून वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न एका महिला पोलिसाने केला. पनवेल पोलिसांनी या हत्येचा तपास लावून त्या महिला पोलिसाला तिच्या दोन सहकाऱ्यांसह अटक केली आहे.  गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी पनवेल शहर पोलिसांची कौतुक करून त्यांना बक्षिस देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT