narayan rane-uddhav thaceray
narayan rane-uddhav thaceray 
मुख्य बातम्या मोबाईल

बुध्दू, अक्कलशून्य, गांडूळ, मुख्यमंत्री म्हणून लायकी नाही : नारायण राणेंची सटकली

तुषार रुपनवर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. अरेतुरेच्या भाषेत, एकेरी शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. अनेक शिवराळ शब्द त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वापरले. 

राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट देण्यासाठीचे कालचे भाषण होते. देशात सर्वात जास्त ४३ हजार रूग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. मात्र त्याचा काहीही उल्लेख केला नाही. याची जबाबदारी नैतिक म्हणून मुख्यमंत्र्यांवर येतो. राज्य दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे हे कळत नाही. उद्धव ठाकरे हा माणूस मुख्यमंत्री पदासाठी अजिबात लायक नाही. पंतप्रधानांबद्दल बोलायची लायकी उद्धव ठाकरे यांची नाही. मुख्यमंत्र्यांचे कालच भाषण म्हणजे शिवराळ बडबड करणे होते. अशा प्रकारे भाषण कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल नव्हते, अशी टीका त्यांनी केली. 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, असे शिवसैनिकांनाही वाटत नाही. शिवसेनेच्या नेत्यांचीही कामे होत नाही. पुढील वेळी शिवसेनेचे १० ते १५ आमदार येतील, असा अंदाज राणेंनी व्यक्त केला. मराठा समाजाला ठाकरे कधीच आरक्षण देऊ शकत नाही. कायदा,घटना काहीही माहीत नाही. हा बुद्धू मुख्यमंत्री आहे. काहीही अक्कल नाही याला. कालचा मेळावा द्वेषाने केला होता. आमचा तोल गेला तर आम्ही `मातोश्री`ची आतमधील सर्व माहीती बाहेर काढू. आम्हांला काय दादागिरी दाखवतो? लायकी आहे तुझी?गांडूळासारखी भूमिका बजावली निवडणूकीच्या वेळी, अशी भाषा त्यांनी वापरली.

नारायण राणे यांच्याप्रमाणे त्यांचे पूत्र आमदार नितेश आणि माजी खासदार निलेश या दोघांनीही शिवसेनेवर आज जोरदार टीका केली. राणे आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच जमले नाही. त्यामुळे राणे हे नेहमीच ठाकरेंवर टीका करत असतात. आज मात्र राणे कुटुंबातील तिघांनीही सेनेला लक्ष्य करत धुरळा उडवून दिला. 

'छोट्या फावड्याला वाचवण्यासाठी मोठा फावडा काल इतका बरळत होता की त्याचं त्यालाच कळलं नाही तो काय बोलतोय. ज्यांच्या घरात घाणेरडी लफडी आहेत ते दुसऱ्यांवर गल्लीच्या कुत्र्यासारखे भुंकले. सम्राठाची लफडी महाराष्ट्राला कळली तर xxx लपून महाराष्ट्र सोडावा लागेल,'' असे निलेश यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात......नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही xxवर मारतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT