Narayan Rane .jpg
Narayan Rane .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

बाळासाहेब म्हणाले असते नारायण तु असेच यश मिळव!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची आज मुंबईत जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्का येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना अभिवादन केले. यावेळी नितेश राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. (Narayan Rane greets Balasaheb's memorial) 

यानंतर राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून अशीच प्रगती कर, असा आशिर्वाद दिला असता. शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणार, असा विश्वास यावेळी राणे यांनी व्यक्त केला. साहेब आज तुन्ही मला आशिर्वाद देण्यासाठी हवे होते. साहेब असते तर म्हणले असते, नारायण तु असेच यश मिळव. कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो त्या ठिकाणी भावनेचा विचार करावा. डाव्या उजव्यांना बोलायला लावू नये. थेट बोलावे. माझी ख्याती आहे, मी जशाच तसे उत्तर देणारा माणूस आहे, असे राणे यांनी सांगितले.  

मुंबई महापालिका निवडणुक जिंकने ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका आम्ही जिंकणारच, जनतेला आम्ही भेटतो आहे. ते आड मार्गाने येवून बसले आहेत. कोरोनाचे जे नियम आहे. ते त्याचे आम्ही पालन करुन. आम्हाला उगाचच सल्ला देऊ नका, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.   

दरम्यान, नारायण राणे यांचे मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT