मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची येत्या १९ ऑगस्टपासून जनआशिर्वाद (JanAshirvad Yatra) यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेचा दौरा निश्चित झाला असून येत्या 19 आॅगस्ट रोजी राणे मुंबईत दाखल होणार आहेत. यात्रेचा पहिलाच दिवस वादाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राणे हे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. (Narayan Rane will pay homage to the memorial of ShivSena chief Balasaheb Thackeray)
यावरून शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटू शकतो. राणेंनी या स्थळाला भेट देण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. स्मृतीस्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. राणे यांच्यासारखा यांसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेइमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
दुसरीकडे राणेंचा दौरा पक्का झाला आहे. मंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यात टिचर्स काॅलनी, शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते दादर येथील ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यानंतर वीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शन घेणार आहेत. महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, लालबागचा राजा येथे जाऊनही ते दर्शन घेणार आहेत. मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे ते अभिादन करतील.
महाराष्ट्रातील चार केंद्रीय मंत्री सध्या जनआशिर्वाद यात्रेत आहेत. भागवत कऱ्हाड हे मराठवाड्यात, भारती पवार या प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात, कपिल पाटील हे नवी मुंबई पट्टयात दौरे करत आहेत. राणे यांचा दौरा मात्र सर्वाधिक चर्चेचा ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबईत शिवसैनिक त्यांचे स्वागत कसे करणार, याकडे लक्ष लागले आहे. कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनाही दक्ष राहावे लागणार आहे. राणे यांनी शिवसेना सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच राणे, त्यांचे दोन्ही पूत्र निलेश आणि नितेश हे शिवसेनेवर नेहमीच टीका करत असतात. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य हे त्यांचे विशेष लक्ष्य असतात. त्यामुळेच सेनेत त्यांच्याविषयी कडवट भावना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.