modi 1
modi 1 
मुख्य बातम्या मोबाईल

नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी देशाला मार्गदर्शन करणार...पण नेहमीची वेळ बदललीय!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (14 एप्रिल, मंगळवार) देशाला सकाळी दहा वाजता संबोधित कऱणार आहेत. कोरोनासाठीचा लाॅक डाऊन कालावधी हा 15 एप्रिल रोजी संपत आहे. त्या आधीच मोदी हे देशाला आता नवीन काय धोरणे सरकार आखणार, याविषयी बोलणार आहेत.

मोदी हे देशाला मार्गदर्शन कऱणार असल्याची चर्चा गेले दोन-तीन दिवस होती. मात्र त्याचा इन्कार करण्यात आला होता. आज पंतप्रधान कार्यालयाने दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही घोषणा केली. केंद्राने लागू केलेला 21 दिवसांचा लाॅक डाऊनचा कालावधी कसा शिथिल करावा, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी लाॅत डाऊन कालावधी वाढविण्याकडे कल दाखविला. त्यानुसार महाराष्ट्र, पंजाब, ओरिसा या राज्यांनी तसे निर्णय जाहीर देखील केले. मात्र या लाॅक डाऊनमुळे आता गरिबांचे हाल होऊ लागल्याने त्यावर मार्ग काढणे गरजेचे झाले आहे.

मोदींनी कोरोनासाठी आतापर्यंत तीन वेळा देशाला मार्गदर्शन केले. ती वेळ रात्री आठची होती. आता पहिल्यांदाच सकाळी दहा वाजता ते बोलणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT