Narhari Zirwal
Narhari Zirwal 
मुख्य बातम्या मोबाईल

नरहरी झिरवळांनी जिल्हा बॅंकेला खडसावले, शेतकऱ्यांना कर्ज द्या!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषीकर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषीकर्जापासून वंचित आहेत. (Farmers are deprived from crop loan) विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, (Bank shall start crop loan to farmers) असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Aseembly vice president Narhari Zirwal) यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला केले. 

मुंबई विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या कर्जवाटप, वसुली व टीडीएस कपात आदी अडचणींबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खासगी सचिव संतोष पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी श्री. झिरवाळ बोलत होते. 

बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाबूशेठ बागमार, जिल्हा बँकेचे प्रशासक एम. ए. अरिफ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष सचिव मुकेश भोगे, आंबे दिंडोरीचे उपसरपंच सुभाष वाघ, राजेंद्र परदेशी, गोपाळ धूम आदी उपस्थित होते. 
या वेळी सचिव पाटील यांनी बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध उपाय सुचवत प्रशासकांनी त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या द्याव्यात, असे सांगितले. 

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेने एवढ्या अडचणींच्या काळातही अनेक सोसायट्यांमधील अनिष्ट तफावत दूर होत सोसायट्यांचे कर्जवाटप सुरू झाले आहे. ‘ब’ वर्गातील काही सोसायट्यांची अनिष्ट तफावत दूर झाली. तसाच प्रयत्न ‘क’ वर्गासाठी करावा व जास्तीत जास्त कर्जवाटप करावे, असे आवाहन करण्यात आले. 

या वेळी जिल्हा बँक संचालक गणपत पाटील, माजी आमदार जयंत जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेतकरी बाबूशेठ बागमार यांनी विविध सूचना मांडल्या. प्रशासक आरिफ व मुख्य कार्यकारी संचालक पिंगळे यांनी या सर्व सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले. याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या प्रशासकीय सूचना करत अडचणींवर मार्ग काढण्यात येईल, असे संतोष पाटील यांनी सांगितले. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT