Kailas Jadhav
Kailas Jadhav 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिका उभारणार दोन ऑक्सिजन प्रकल्प

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी आणि गंगापूर येथे हवेतील प्राणवायू शोषणारा एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जागेची पाहणी केली. या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. 

शहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्सिजनचा होणारा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी त्यावर नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोरवाडी, गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या अनुषंगाने मोरवाडी येथील `यूपीएससी`च्या बाजूच्या मोकळ्या मैदानाचे तसेच प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली.

गंगापूर `यूपीएससी`च्या बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सीजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या एअर ऑक्सीजन प्लांटच्या माध्यमातून  जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात जाणवणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे  नियोजन करणे शक्य करणे  होणार आहे. या पाहणीच्या वेळी मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषध साठ्याची माहिती यावेळी आयुक्त जाधव यांनी घेतली. गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषध साठा व रुग्णांना मनपाच्या वतीने दिली जात असणाऱ्या सेवेची माहिती आयुक्तांनी यावेळी घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयुर पाटील, नितीन नेर नोडल वैद्यकीय  अधिकारी डॉ. योगेश कोशिरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT