Balātkāra kartun
Balātkāra kartun 
मुख्य बातम्या मोबाईल

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले. 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : चाकूचा धाक दाखवून सामानगाव रोड, अरिंगळे मळा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहाजणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, ताब्यात घेतलेल्या संशयितांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अरिंगळे मळा येथे मजुरी काम करून घरी आल्यावर शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी घरात न दिसल्यामुळे आई वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पीडित मुलीच्या लहान बहिणीला व भावाला आई वडिलांनी या बद्दल विचारणा केली. असता घरी नाही असे, सांगितल्यावर तिचा शोध घेतला. त्यावेळी ती परिसरात आढळून आली. आई वडिलांनी विचारपूस केली असता, मुलगी रडू लागली. तिने, आपल्यावर घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला. 

पीडित मुलीच्या आई वडिलांनी नाशिकरोड पोलिसात धाव घेऊन दीपक समाधान खरात (वय १९, रा. मनपा शाळा मागे सिन्नर फाटा), रवी संतोष कुऱ्हाडे (वय १९, रा. पांडवलेणी), आकाश राजेंद्र गायकवाड (वय २४, रा. रेल्वे ट्रक्शन), सुनील निबाजी कोळे (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी), सोमनाथ विजय खारत (१९ रा. गुलाबावडी), एक अल्पवयीन मुलगा या सहा संशयितांना बलात्कार करण्यासाठी घर उपलब्ध करून दिले, म्हणून पूजा सुनिल वाघ (वय २१) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच आरोपीसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालायाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस उपायुक्त विजय खरात, साह्ययक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राऊत पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT