मुख्य बातम्या मोबाईल

नागरिकांनी साथ दिल्यास नाशिक देशात पहिल्या दहामध्ये येईल

सरकारनामा ब्युरो

नाशिक : स्मार्ट सिटी प्रकल्पांत नाशिकला राज्यात पहिला, देशात पंधरावा क्रमांक मिळाला. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक प्रबोधन, यापूर्वीच्या त्रुटींमध्ये सुधारणा आणि  महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मोठे यश मिळाले. नागरिकांनी यापुढेही महापालिकेला साथ दिल्यास पुढील वर्षी नाशिक पहिल्या दहामध्ये येईल, असा विश्‍वास महापालिकेचे मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला. 

महापालिकेचे मावळते आयुक्त श्री. गमे यांची काल नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. नुकतेच नाशिक शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत देशात पंधरावे आले. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शहरातील नागरिकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणातील दहा लाख लोकसंख्येच्या गटात नाशिक महापालिकेला अकरावा क्रमांक प्राप्त झाला. २०१६ पासून राष्ट्रीयीस्तरावर स्वच्छतेबाबत स्पर्धा सुरू आहे. २०१७ मध्ये नाशिक देशात १५१ वे आले. २०१८ मध्ये ६३ वा, २०१९ मध्ये ६७ वा क्रमांक आला. चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करूनही अपेक्षित क्रमांक मिळत नव्हता. यंदा आयुक्त गमे यांनी विशेष मेहनत घेऊन केलेल्या नियोजनाचे फलित म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी यशाचे गमक स्पष्ट केले. 

प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते, हे खरे आहे, असे सांगून श्री. गमे म्हणाले, यंदा सूक्ष्म नियोजन केले. त्रुटी भरून काढण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला. त्यानंतर नियोजन केले. शहरातील ३१ प्रभागांमध्ये ३१ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर प्रशासन अधिकारी मनोज घोडे-पाटील यांची मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आठवड्यातून एक बैठक व त्या बैठकीत त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यातून स्वच्छतेचे उद्दिष्टांपर्यंत पोचलो. 

ते म्हणाले, प्रथम सिटी प्रोफाइल निश्‍चित केले. त्यात रहिवासी, व्यावसायिक, सार्वजनिक, शैक्षणिक संस्था, हॉटेल, टुरिस्ट स्पॉट, ज्या भागात अधिक कचरा उत्पन्न होतो तो भाग, ट्रान्सपोर्ट हब, उद्याने, वॉटर बॉडी जसे सोमेश्‍वर धबधबा, रामकुंड व पुराचे पाणी साचणारी स्थळे यांची यादी तयार केली. त्यानुसार तेथे विभागप्रमुखांवर विभागनिहाय जबाबदारी निश्‍चित केली. प्रत्येक ठिकाणी झीरो वेस्टेज स्पॉट धोरण निश्‍चित केले. यापुढील काळात प्रशासनाने अधिक चांगले काम करण्याचे नियोजन केले आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT