Suraj Mandhare
Suraj Mandhare 
मुख्य बातम्या मोबाईल

नाशिकमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता दारूसह बार बंद!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शहर व जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आता याबाबातचे निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. त्यानुसार उद्यापासून जीवनाश्यक वस्तू वगळता उर्वरीत सर्व दुकाने येत्या 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये दारू दुकाने व बारचा समावेष असल्याने तळीरामांचे घसे चांगलेच कोरडे होणार आहेत. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्याची नाशिकला जशीच्या तशी अंमलबजावणी केली जाणार आहे. यापुढे सर्व जीवनाश्यक वस्तूंचे दुकाने सकाळी सात ते रात्री आठ यावेळेत सुरु राहतील. यासंदर्भात जीवनाश्यक वस्तूंची दुकाने नेमकी कोणती याबाबत सातत्याने विचारणा होत असल्याने त्यांनी त्याचा आदेश प्रसारीत केला आहे. जीवनाश्यक सेवांमध्ये दवाखाने, वैद्यकीय तपासणी केंद्र, क्लीनीक्स, औषधाची दुकाने, वैद्यकीय सेवा, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, दूध, बेकरी, खाद्यपेय दुकाने, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि प्रवासी बसेस, शेतीशी संबंधीत सेवा यांचा समावेष आहे. उर्वरीत सर्व दुकाने बंद ठेवली जाणार असल्याने तसेच बाजारपेठे यापूर्वीच बॅरीकेडींग करण्यात आलेले असल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाने गंभीर उपाययोजना सुरु केली आहे. 

यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच निर्बंधांचे गांभीर्याने पालन करावे अन्यथा अधिक गंभीर निर्णय घेण्याचे सुतोवाच केले होते. शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तो नियंत्रणात येत नसल्याने हे खंबीर पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी मद्यविक्रीची दुकाने तसेच बार सुरु होती. त्यांना बंदमधून वगळण्यात आले होते. आता मात्र त्यांचाही समावेष झाल्याने मद्य शौकीनांची चांगलीच धावपळ उडाली आहे. अनेकांचे घसे या आदेशाने कोरडे झाल्याची प्रतिक्रीया येत आहे. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT