Nathuram godse bhakt babulal chaurasia return to congress
Nathuram godse bhakt babulal chaurasia return to congress 
मुख्य बातम्या मोबाईल

नथुराम गोडसेची पूजा करणाऱ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था

भोपाळ : हिंदू महासभेकडून निवडणूक लढविणारे आणि नथुराम गोडसेची पूजा करणाऱ्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच काँग्रेसमधूनही या प्रवेशाला विरोध होऊ लागला आहे. 

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात नगरसेवक असलेले बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौरसिया हे काही वर्षांपूर्वीही काँग्रेसमध्ये होते. मागील महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी हिंदू महासभेकडून निवडणूक लढवत जिंकलीही होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शम्मी शर्मा यांचा पराभव केला होता. 

हिंदू महासभेमध्ये गेल्यानंतर चौरसिया यांनी नथुराम गोडसे यांची पूजा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच चौरसिया काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, यावर बोलताना चौरसिया यांनी मी जन्मजात काँग्रेसी असल्याचे म्हटले आहे. हिंदू महासभेने मला अंधारात ठेवून गोडसेची पूजा केली होती. मागील दोन-तीन वर्षांपासून मी अशा कार्यक्रमांपासून दूर आहे. हिंदू महासभेचे विचारधारा मला पटली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ''गोडसे के पुजारी और काँग्रेस की सवारी. काँग्रेस महात्मा गांधींच्या नावाचा वापर केवळ नोट आणि मतांसाठीच करते,'' असे मिश्रा म्हणाले.

काँग्रेसचे नेते मानक अग्रवाल यांनीही चौरसिया यांच्या काँग्रेस प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. गोडसेची पूजा करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये. आम्ही त्याच्या विरोधात आहोत. कमलनाथ यांना चौरसिया यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल, म्हणून त्यांना प्रवेश देण्यात आला असावा, असे ते म्हणाले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT