Navnit Rana
Navnit Rana  
मुख्य बातम्या मोबाईल

नवनित राणा म्हणाल्या : रस्त्यावर उतरीन, पण त्या मुलीला न्याय मिळवून देईन 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब सेंटरमध्ये गेलेल्या एका मुलीच्या गुप्तांगाचा स्वॅब लॅब टेक्निशिअनने घेतला. या चिड आणणाऱ्या, घृणास्पद प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या प्रकरणी प्रशासन आपली जवाबदारी झटकू शकत नाही. त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरुन लढा देऊ, असे खासदार नवनित राणा म्हणाल्या. 

कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब सेंटरमध्ये गेलेल्या मुलीसोबत झालेल्या या घृणास्पद प्रकाराने अमरावतीकरच नव्हे तर प्रत्येक जण संतप्त झाला आहे. आज शिवसेना आणि एआयएमआयएमच्याच्या कार्यकर्त्यांनी त्या हॉस्पिटलच्या स्वॅब सेंटरची तोडफोड करुन संताप व्यक्त केला. अतिशय घाणेरडे, संताप आणणारे कृत्य करणाऱ्या टेक्निशिअनवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांनी या घृणास्पद प्रकाराबद्दल प्रचंड चिड व्यक्त केली आहे. एखाद्या ग्रामीण भागातील महिलेसोबत जर असा प्रकार झाला, तर ती जवाबदारी त्या महिलेची आहे की प्रशासनाची, असा प्रश्‍न खासदार राणा यांनी उपस्थित केला. 

कडक कारवाई केली : यशोमती ठाकूर 
त्या टेक्निशिअनवर कडक कारवाई केलेली आहे. विनयभंग आणि ॲट्रॉसिटी, असे दोन्ही गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत. युवा पिढीमध्ये अशी विकृती येते कुठून, या प्रश्‍नाची उकल काही केल्या होत नाही. पण या विकृतीला थांबवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल आणि अशा लोकांचा नाही, तर असा प्रवृत्तीचा बिमोड करावा लागेल, असे राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.   (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT