मुख्य बातम्या मोबाईल

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार

प्रमोद बोडके

सोलापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये पंढरपूर नंतर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली असून याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. आता त्या तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जुबेर बागवान यांच्या माध्यमातून आज स्वतंत्र उमेदवार दिला आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात हा उमेदवार राष्ट्रवादीने दिला आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT