ED Dilip Thete
ED Dilip Thete 
मुख्य बातम्या मोबाईल

`राष्ट्रवादी`च्या दिलीप थेटे यांना ‘ईडी’च्या नावाने खंडणीची धमकी?

सरकारनामा ब्युरो

नाशिक : येथील राष्ट्रवादी कॅांग्रेसचे (NCP leader) नेते व नाशिक बाजार समितीचे संचालक दिलीप थेटे (APMC director dilip Thete) यांना ‘ईडी’चे अधिकारी असल्याचे सांगत खंडणीची (Threaten call for Ransom on ED)  मागणी करण्यात आली. याबाबत त्यांना दुरध्वनीवरून तशी दमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. 

श्री. थेटे यांना, तुमच्या चार ते पाच फायली आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी ‘ईडी’ (सक्त वसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..' असा फोन करून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. 

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. राजकीय नेत्यांवरील धडक कारवाईमुळे ‘ईडी’ अर्थात, सक्त वसुली संचालनालय ही भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था चर्चेत आहे. ‘ईडी’च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेत एकाने बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी केला.

‘ईडी’चा हा तोतया अधिकारी असल्याचे त्याच्या संभाषणावरून लक्षात आल्यानंतर शनिवारी श्री. थेटे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. संशयिताने थेटे यांना व्यवहारराच्या अनुषंगाने चार फायली आल्या असून, आता काही वेळातच आर्थिक गुन्हे शाखेकडून तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. हा गुन्हा जर दाखल होऊ द्यायचा नसेल, तर काही देवाणघेवाण करून हे प्रकरण येथेच थांबवता येईल, असे सांगितल्याचे श्री. थेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

श्री. थेटे यांनी त्याच्याकडे थोडा वेळ मागून याबाबत पुढे काय करायचे ते कळवितो, असे त्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने श्री. थेटे यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्या तोतया ‘ईडी’ अधिकाऱ्याने थेटे यांच्याकडून घर, जमीन, कुटुंबाबाबत सर्व माहिती विचारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खोटी शासकीय अधिकारी अशी ओळख सांगून तोतयागिरी करून ठकबाजी करण्याचा प्रयत्न करीत खंडणी मागितल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह खंडणी वसुलीसाठी धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

अमरावतीत धागेदोरे
शहरातील काही शासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यांना काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धमकवल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आता सायबर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाद्वारे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरवात केली आहे. त्याचे धागेदोरे विदर्भाकडे सरकले असून, ते अमरावतीपर्यंत येऊन थांबल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होती.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT