3eknath_20khadase_girish_20mahajan_0.jpg
3eknath_20khadase_girish_20mahajan_0.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

जळगाव जिल्हा बॅक निवडणुकीत खडसे-महाजन एकत्र येणार?  

सरकारनामा ब्युरो

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील Satish Patil व गुलाबराव देवकर Gulabrao Deokar यांनी आज मुंबईत एकनाथ खडसे Eknath Khadse यांची भेट घेतली. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय  पॅनल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुका लवकरच होत आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता तयारी सुरू झाली आहे. जळगाव जिल्हा बॅंकेवर एकनाथ खडसे यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या कन्या अँड. रोहिणी खडसे अध्यक्ष आहेत. मागील निवडणुका झाल्या त्यावेळी खडसे भारतीय जनता पक्षात होते. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते. या वेळी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. यावेळी ही सर्वपक्षीय पॅनल करण्याबाबत विचार सुरू आहे.

राणेंना पक्षश्रेष्ठींनी दिलं 'टार्गेट' ;  शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी व्यूहरचना
या संदर्भात भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. सतीष पाटील व गुलाबराव देवकर मुंबईत खडसे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यास गेले होते. या बाबत डॉ. सतीष पाटील यांनी सांगितले की, आम्ही मुंबईत खडसे यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा केली. यात पुन्हा पक्षीय पॅनल करण्यावर चर्चा झाली. खडसे यांनी सकारात्मकता दाखवली आहे.  

जळगाव येथे आल्यानंतर त्या बाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने डॉ. पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्हा बँकेत सध्या असलेल्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपचे गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, हे संचालक आहेत. सध्या एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. मात्र, सहकारात पक्षीय वाद बाजूला ठेवून ते एकत्र येणार काय ? या कडेच आता लक्ष आहे.
  Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT