Mla Babanrao lonikar press conference news parbhani
Mla Babanrao lonikar press conference news parbhani 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादी- शिवसेनेने मिळून उर्जामंत्र्यांचा गेम केला, त्यांना काॅंग्रेस संपवायची आहे..

गणेश पांडे

परभणी ः खुद्द उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफ केले जाईल अशी घोषणा केली होती. परंतू सत्तेत बसलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसनेच नितीन राऊत यांचा गेम केला. त्यामुळेच उर्जामंत्र्यांनी वीज बिल माफीबद्दल घुमजाव केले, असा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. पुढील निवडणुकीत या दोन्ही पक्षांना कॉग्रेस संपवायचीच आहे असे दिसते,असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपुर्ती निमित्त भाजपच्या वतीने हे सरकार कसे अपयशी ठरले हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदांचे आयोजन केले जात आहे. परभणीत आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. लोणीकर म्हणाले, सरकार स्थापनेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जी आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करता आलेली नाहीत. वर्षभराच्या कामकाजात सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे हे सरकार असून राज्यातील अनेक महत्वकांक्षी योजनांना स्थगिती देण्याचे काम वर्षभरात सरकारने केले आहे. मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा मिटविण्यासाठी भाजप सरकारने सुरु केलेल्या मराठवाडा वॉटरग्रिड या योजनेलाही स्थगितीती देण्याचे काम करून परत मराठवाड्याला दुष्काळाच्या छायेत लोटण्यात आले.

कोरोनाचा सामना करत असतांना राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी वीज बिलाची माफी देण्यात येणार असल्याची घोषणा उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. परंतू नंतर त्यांनी या विधानावरून घुमजाव केला. खरे तर मंत्री नितीन राऊत यांचा या विधानावरून त्यांचेच मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसने गेम केल्याचा आरोप लोणीकरांनी केला. यावरूनच या दोन्ही पक्षांना पुढील निवडणुकीत राज्यातून कॉग्रेस पूर्णपणे संपवायची आहे हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे पाप कॉग्रेसच्या पारड्यात...

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना व राष्ट्रावादी कॉग्रेसची भुमिका ही शकुनीमामाची आहे. त्यांच्यासारखे डाव हे दोन पक्ष टाकत आहेत. कोरोनाच्या काळात झालेल्या खर्चाचा हिशोब दिला जात नाही. उलट टेस्टींग किटच्या खरेदीवरून झालेला घोळ आरोग्य मंत्री कॉग्रेसच्या मंत्र्यांवर ठकलून मोकळे होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस स्वताची पापे कॉग्रसेच्या पारड्यात टाकत असल्याचा आरोपही  लोणीकरांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT