मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणते, `नाशिकमध्ये जमावबंदी लागू करा`

सरकारनामा ब्युरो

नाशिक : नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण होत आहेत. कोरोना नियंत्रणात येण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागात जमावबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना पत्र पाठविले आहे. ते म्हणाले, वैश्विक महामारी असलेल्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेकरिता तसेच आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. 

कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन तसेच प्रशासन विविध उपाययोजना करते. त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक विनाकारण रस्त्यावर विनामास्क फिरताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास नाशिक महानगरपालिका अपयशी ठरली असून सर्वस्तरावरून विरोध होत असताना रॅपीड टेस्टची मोहीम घेण्यात आली.  शहरात महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर असून अद्यापपर्यंत कोविड हॉस्पिटल सुरु करता आलेले नाही. प्रत्येक दिवशी महापालिकेच्या रुग्णालयात रोज नव्या घटना घडत आहे. रुग्णालयाचा निकृष्ट दर्जा या घटनेतून समोर आला आहे. महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असून कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात कोरोनामुक्त  रुग्णांची संख्या व कोरोना बाधितांची संख्या सारखी असल्याने नाशिक मधील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही.  यासाठी नाशिक शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागात जमावबंदी लागू करावी.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX8SDkAs&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=a28a6484dc15d77461787572d3347ecb&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT