bjpncp
bjpncp 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाच्या संकटात काम करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांबरोबरच प्रत्यक्षात आंदोलन करून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी भाजपाला जशास तसे उत्तर देण्याचा निश्‍चय केला आहे.

'मी कोरोना योद्धा, मी सरकारसोबत' ही टॅग लाइन वापरून समाज माध्यमाच्या फेसबुक, टविटर या व्यासपीठावर भाजपाच्या विरोधात हे कार्यकर्ते लढणार आहेत. संकटाच्या काळात सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी भाजपा खुर्चीसाठी निर्लज्जपणा करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यकर्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

संकटकाळात राजकारण करून राज्यपालांकडे जाऊन निवेदने देणे, राज्याला मदत न करता पीएम फंडात पैसे देणे, राज्य सरकारला सहकार्य न करता केवळ राजकारण करणे, भाजप आमदारांचे सोशल डिस्टसिंगला हरताळ फासून गर्दी करणे, मदत पीएम फंडाला करून पॅकेजची मागणी राज्याकडून करणे, मृत्यूच्या खाईत लोटला जाणारा महाराष्ट्र आणि राजकारण करण्यात मश्गुल भारतीय जनता पक्ष. या पक्षाला आणि त्याच्या सुमार नेत्यांना जागा दाखवून देण्यासाठी 'भाजपपासून महाराष्ट्र वाचवा', ही मोहीम समाज माध्यमातून राबविणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका भाजपाच्यावतीने सरकारवर ठेवण्यात येत आहे. रूग्णालयात विशेषत: खासगी रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांची अर्थिक लूट करण्यात येत आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरातील रूग्णालयांकडून होणारी लूट फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. कल्याण- डोंबिवली तसेच ठाणे महापालिकेत जाहीर केलेल्या दर पत्रकाची यादीच फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सादर केली आहे. राज्य सरकारने रूग्णांच्या होणाऱ्या या लुटीला आळा घालावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपाने सरकारविरोधात राज्यभर आंदोलनाची तयारी केली आहे.  राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT