मुख्य बातम्या मोबाईल

जिल्हा बॅंक अध्यक्ष "नॉट रिचेबल', न्याय कुठे मागायचा? 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बॅंकेच्या कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय मोगल यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात धरणे धरले.

यावेळी या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. आंदोलकांनी वारंवार प्रयत्न करुनही बॅंकेच्या अध्यक्षांशी संपर्क झाला. त्यांचा फोन "नॉट रिचेबल' होता. त्यामुळे अद्यक्षच नॉट रिचेबल असतली, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्‍न आंदोलकांनी केला. 

यासंदर्भात बॅंकेच्या मुख्य कार्यालयात धरणे धरण्यात आले. त्यानंतर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा बॅंकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी बॅंकेविषयीच्या आपुलकीतून निवृत्तीनंतरचा निर्वाह सुरक्षित व सुखात जावा या उद्देशाने आपल्या कुटुंबियांच्या सर्व रक्कमा जिल्हा बॅंकेतच ठेव म्हणून ठेवल्या. मात्र बॅंकेची आर्थिक स्थिती ढासळल्यापासून या सेवकांना त्यांची मूळ ठेव मिळाली नाही. त्यावरील व्याज देखील मिळत नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या बॅंकेकडे आर्थिक उपलब्धता आहे. त्यामुळे बॅंकेने या कर्मचाऱ्यांच्या ठेवी परत कराव्यात. गेल्या दोन- तीन वर्षांपासून निवृत्त झालेल्या सेवकांच्या देय रक्कमा निधीच्या कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांना सक्तीने बॅंकेत गुंतविण्यास भाग पाडले जाते. विशेष बाब म्हणजे त्यांना मिळणारी ग्रॅच्युईटीची रक्कम आयुर्विमा महामंडळाकडून राष्ट्रीयकृत बॅंकेकडून वर्ग होते. ती रक्कम देखील संबंधित सेवकास न देता त्याच्या ठेव खात्यात जमा केली जाते. त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो. ही अतिशय गंभीर बाब आहे. हा एक प्रकारे गैरव्यवहाराचाच प्रकार असल्याचा आरोप यावेळी विजय मोगल यांनी केला. 

जिल्हा बॅंकेच्या कर्ज वसुली अभावी बॅंकेची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. बॅंकेचे कामकाज ठप्प आहे. बॅंकेचे कर्मचारी बसून आहेत. सेवा सहकारी संस्थांचे काम ठप्प आहे. त्यामुळे या सोसायट्यांचे सचिव देखील संस्थांत नसतात. असे असतानाही गरज नसतांना या सचिवांना बॅंकेकडून दोन कोटी रुपये अदा करण्यात आले. गरज नसतांना कर्मचाऱ्यांना पगार वाढीसाठी, न्यायालयीन खर्च आदींवर मोठा खर्च केला गेला. ठेवीदारांना मात्र निधी उपलब्ध नाही, असे कारण देऊन बॅंकेचे व्यवस्थापन व सहकार विभाग पुढे करते. त्यातून निवृत्त कर्मचारी व ठेवीदारांची मोठी गैरसोय होत असल्याने तातडीने ठेवी देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी लक्ष्मण शिंदे, सोमनाथ बोराडे, माजी कार्यकारी संचालक सुरेश रायते, जे. एस. पवार, शंकरराव चव्हाणके, डी. एन. ढगे, लहू ढिकले, किरण जाधव आदींसह मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनात भाग घेतला. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX9SkCWm&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=728c2ec1929f72bdfd07eccae4909877&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT