Sachin Waze .jpg
Sachin Waze .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सचिन वाझेसोबत त्या दिवशी ती महिला कोण होती...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एंटीलिया  स्फोटक प्रकरणात निलंबित पोलिस आधिकारी सचिन वाझे बाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) तपासादरम्यान समोर आला आहे. एनआयएने काल सोमवार (ता. २२ मार्च) दक्षिण मुंबईतील ट्राइडेंट पंचतारांकित हॅाटेलमध्ये कारवाई केली.

या हॅाटेलमध्ये वाझे हे सुशांत सदाशिव खामकर या नावाने १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान रहात होते. NIA च्या हाती वाझेचे बनावट आधार कार्ड लागले आहे. मुंबईत घर असताना वाझे पाच दिवस तेथे का रहात होते. त्यांना भेटायला तेथे कोण कोण आले होते, याचा तपास आता NIA करत आहे. या पंचताराकिंत हॅाटेलमधून काही वस्तू NIA ने ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता. पुणे न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे अधिकारी NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. 

NIA ने ट्राइडेंट हॉटेलमधून जप्त केलेल्या सीसीटीव्हीवरुन सचिन वाझेजवळ 5 बॅग असल्याची माहिती समोर आली आहे. या बॅगमध्ये नेमंक काय होते ते वाझे यांच्या चौकशीतून समोर येणार आहे. वाझे यांना सीसीटीव्ही दाखवून चौकशी करण्यात येणार आहे. या सीसीटीव्हीमध्ये एक महिला दिसत आहे. त्या महिलेजवळ नोटा मोजण्याची मशीन दिसत आहे. ती महिला कोण आहे. या प्रकरणात त्या महिलेचा का संबंध काय आहे. त्याची चौकशी NIA करत आहे.

हॅाटेलमधील सीसीटीव्हीमध्ये 5 बॅग असल्याचे दिसून येत आहे. त्यापैकीच एका बॅगेत जेलेटिन कांड्या असल्याची शंका NIA ला आहे. ज्या 25 फेब्रुवारीला अँन्टीलियाच्या बाहेर ठेवण्यात आल्या.  एंटीलिया कार स्फोटक  प्रकरणात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी. एनआयए कार्यालयात आणण्यात आली आहे. ही तिच गाडी आहे ज्यामध्ये स्फोटक सापडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT