new zealand governmet use pornstar to educate youth  
मुख्य बातम्या मोबाईल

सरकारने 'या' कामासाठी घेतली चक्क पोर्नस्टारची मदत

युवकांना शारीरिक संबंधांबाबत शिक्षित करण्यासाठी न्यूझिलंड सरकारने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी चक्क दोन पोर्नस्टारची मदत घेतली आहे.

वृत्तसंस्था

वेलिंग्टन : न्यूझिलंड सरकारने युवकांना लैंगिक संबंध आणि लैंगिक संबंधांची संमती या विषयी शिक्षण देण्यासाठी पोर्नस्टारची मदत घेतली आहे. युवकांना लैंगिक संबंधाविषयी माहिती देण्यासाठी जाहिरात मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातील जाहिरातीत दोन पोर्नस्टार झळकल्या  आहेत. 

जाहिरातींमध्ये सू आणि डेरेक या दोन पोर्नस्टारचा सहभाग आहे. यात त्या एका घराच्या दरवाज्यात नग्न उभ्या आहेत. घरातून बाहेर आलेल्या महिलेला त्या दोघी तिचा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा करतात. त्या महिलेचा मुलगा त्या दोघींनी वारंवार चोरून पाहत असतो त्यामुळे त्या दोघी त्याला भेटायला आलेल्या असतात, असा या विनोदी जाहिरातीचा आशय आहे. 

एक मिनिटांच्या या जाहिरातीत मुलाच्या आईची भूमिका विनोदी कलाकार जस्टिन स्मिथ यांनी केली आहे. तुमचा मुलगा आम्हाला लॅपटॉप, आयपॅड, प्लेस्टेशन, त्याचा मोबाईल, तुमचा मोबाई आणि स्मार्ट टीव्हीच्या प्रोजेक्टरवर पाहतो,  असे दोन पोर्नस्टार जाहिरातीतील मुलाच्या आईला सांगतात. याचबरोबर त्या पोर्न हे खरे नसते, असेही त्या नमूद करतात. प्रत्यक्ष लैंगिक संबंध आणि पोर्न या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असतात. याविषयी युवकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने हिंदी चित्रपटसृष्टीसह सामान्य नागरिकांना धक्का बसला. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत असून, याआधी अनेक सेलिब्रेटिंनी नैराश्यग्रस्त होऊन जीवन संपविले आहे. नैराश्यावर कायम उघडपणे बोलले जात नाही आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी त्यांनाही आत्महत्येचे विचार येत होते, अशी जाहीर कबुली देऊन या विषयावरील चर्चेला सुरूवात केली आहे. देवरा यांनी ट्विटरवर स्वत:चे अनुभव मांडले आहेत. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी व्यक्तिगत अनुभवही सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, मला आत्महत्येचा विचार 16-17 वर्षांचा असताना आला. त्यावेळी हा अनुभव हादरवून टाकणारा होता. कारण माझ्याबाबत काय चुकीचे घडत आहे, हे कोणालाच कळत नव्हते. माझ्या आईने मला समुपदेशकांकडे पाठविले आणि त्याचा मला फायदा झाला. हे नैराश्य 3ते 4 महिन्यांत निघून गेले. त्यानंतर 2006-07 मध्ये खासदार असताना मला पुन्हा नैराश्य आले. त्यावेळी मी खासदार होतो. अनेक वेळा मला आत्महत्येचा विचार आला. मी कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने यावर मात केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT