Nilesh Rane Constantly Criticizing Shivsena Through Twitter
Nilesh Rane Constantly Criticizing Shivsena Through Twitter 
मुख्य बातम्या मोबाईल

आधी तिकीटासाठी पैसे द्या आणि नंतर 'यांची' भांडी पण घासा : निलेश राणेंचा पुन्हा वार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेबाबत हालचाली सुरु आहेत. त्यातच शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्यास सांगितले आहे. या आमदारांनी पाच दिवसांचे कपडे आणि आपले आधार-पॅनकार्ड बरोबर आणावे, असेही शिवसेनेने सांगितले आहे. सेनेच्या या आदेशावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन टीका केली आहे.

'शिवसेना आमदारांना ५ दिवसाचे कपडे व आधार कार्ड आणायला सांगितलं आहे. अशी वागणूक आपण नोकरांना देखील देत नाही. शिवसेना आमदार हे स्व. बाळासाहेबांच्या नावावर व स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत.  उद्धव ठाकरेच्या नाही. आधी तिकीट मिळवायला पैसे द्या आणि जिंकल्यावर यांची भांडी पण घासा...'असे ट्वीट करुन निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. 

यापूर्वीही निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन शिवसेनेवर आणि प्रामुख्याने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. संजय राऊत मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले तेव्हाही हे सगळे नाटक असल्याची टीका निलेश राणेंनी केली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशीही निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे राहू न शकल्याबद्दल शिवसेनेला चिमटा काढला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT