मुख्य बातम्या मोबाईल

ठाकरे बाप आणि मुलाच्या नावावर एकही केस नाही, केस घ्यायची धमक नाही, निलेश राणेंची टीका 

सरकारनामा ब्युरो

पुणे : सरकारी कामात हस्तक्षेप म्हणजे कलम 353 ... पेंग्विन कुठल्याही शासकीय पदावर नाही म्हणून पोलिसांनी या बातमीचा आधार घेऊन त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे पण, ठाकरे बाप आणि मुलाच्या नावावर नाही तरी एक पण केस नाही आणि केस घ्यायची धमक नाही अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या कामकाजातील शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढल्याच्या मुद्यावर नीलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.आदित्य हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राणे यांनी नेहमीप्रमाणे आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख न करता ट्विटवरून समाचार घेतला आहे. त्यांचे बंधू नीतेश राणे यांनी अधिकाऱ्याला चिखलात आंघोळ घातल्याचे प्रकरणही राज्यात तापले आहे. 

या दोन्ही मुद्यावर बोट ठेवत निलेश राणे यांनी म्हटले आहे पालिकेच्या विरोधी पक्षातल्या एका नगरसेवकांनी पोलिसांकडे तक्रार करा कलम 353 खाली बघा हा यायचा बंद होतो की नाही... या ठाकरे बाप आणि मुलाच्या नावावर नाही तरी एक पण केस नाही आणि केस घ्यायची धमक नाही तसेच तिवरे धरणप्रकरणी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना अटक झाली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT